अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- आपल्या व घरातील इतर सदस्यांच्याही जीवितास मोठा धोका असल्याची तक्रार पोटच्या मुलाविरोधात आईनेच दाखल करण्याची घटना तालुक्यातील आंभोळ येथे घडली.
आंभोळ येथील रहिवासी असलेल्या या दुर्दैवी महिलेने आपल्याच मुलांवर अकोले पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला. आंभोळ, तालुका अकोले येथील ५५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली.

बुधवारी ४ ऑगस्ट रोजी अंभोळ येथे आपण घरात असताना मुलगा दिलीप संपत चौधरी याने दारू पिऊन येऊन आम्हास विनाकारण शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली.
आई, वडिलांना व त्याच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी तसेच जवळच पडलेल्या कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने मारहाण, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. नंतर त्याने पत्नीच्या गळ्यातील ३ तोळ्याचा सोन्याचा दागिना व घरातील एक पायली कांद्याचे बियाणे सोबत घेऊन गेला.
या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी फिर्यादीचा मुलगा दिलीप चौधरी याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील पोलिस नाईक गोराणे हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम