Shocking News : लग्न करायला जाताना प्रियकरासोबत असलेल्या प्रेयसीचा जागीच अंत !

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  प्रियकरासोबत बाईकने जात असलेल्या प्रेयसीचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात प्रियकरही जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Shocking News)

दोघंही जण पळून जाऊन लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकरावर तरुणीची बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील जेहानाबाद शहरातील एका 22 वर्षीय विद्यार्थिनीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.

मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र मुलाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. शुक्रवारी सकाळी प्रियकराने तिला भेटण्यासाठी बोलावले.

त्यानंतर कुटुंबीयांना सांगून तरुणी प्रियकरासह निघून गेली. पिलीभीत जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात बाईक झाडावर आदळून झालेल्या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेत मोटारसायकल चालवणारा प्रियकरही गंभीर जखमी झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या नातेवाईकांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला. एवढेच नाही तर प्रेयसीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केला की, त्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे.

मात्र पोलिसांना हा अपघात असल्याचे दाखवून संपूर्ण प्रकरण दडपायचे असल्याचाही दावा केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe