अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- आजकालची पिढी मोबाईलच्या व्यसनात अडकत चालली आहे. मोबाईल हि त्यांची दैनंदिन गरज बनली आहे. व याच गरजेमुळे अनेक अनर्थ घडत आहे.
असाच काहीसा प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे. मोबाईल खेळण्यास घरातील वडीलधाऱ्यांनी मज्जाव केल्याने श्रीरामपूर मधील इंदिरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या आरुष अनिल निकाळजे (वय १५) या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
बोरावके महाविद्यालयाजवळील वसाहतीत आरुष याचे घर आहे. त्याने गळफास घेतल्याचे घरच्या लोकांच्या निदर्शनास येताच त्याला उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे घोषित केले. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक संजय पवार हे पुढील तपास करीत आहे.
वडिलांना मोठा मानसिक धक्का… :- अनिल निकाळजे हे वाहन चालक आहेत. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. दोघांनाही चांगले शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता. मात्र घटनेने त्यांना धक्का बसला आहे.
मोबाईलवर गेम खेळण्यास आरुष याला विरोध केला असता तो रागाने निघून गेला. काही वेळानेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम