धक्कादायक ! नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- गोदावरी नदीकाठी धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर त्याच गावातील आरोपीने जवळच्या काटवनात नेऊन अत्याचार केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात घडली आहे.

याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरेगाव परिसरातील विवाहित महिला सकाळी धुणे धुण्यासाठी गोदावरी नदीकाठी गेली असता त्याच गावातील आरोपी तिच्या पाठलागावर गेला होता.

त्याने आजूबाजूला कोणी नाही ही संधी साधत तिचा हात धरून बळजबरीने काटवनात ओढत नेले व तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. याबाबत संबंधित महिला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली होती.

मात्र तिचा चुलत सासरा यांनी बेइज्जती होईल या भीतीने दूरध्वनीवरून तक्रार देऊ नका घरी जा, असे सांगितल्याने ही तक्रार झाली नव्हती. मात्र त्यांनी तक्रारी अर्ज दिला होता त्यावरून पोलिसानी चौकशी कामी बोलावल्यावर हा प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विजय चंदू जिरे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe