ह्या ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड लसीचा तुटवडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राहता तालुक्यात गेल्या महिनाभरापासून करोनाने कहर केला असून राहाता तालुका करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आठ दिवसांत सर्वाधीक रुग्ण बाधित झाले असून सरकारी व साई संस्थानचे कोव्हिड सेंटरबरोबर खासगी कोव्हिड सेंटरही हाऊसफुल्ल झाले आहे.

यातच तालुका प्रशासनासमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. राहाता ग्रामीण रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून कोव्हिडची लसच शिल्लक नसून नागरिक रोज लसीसाठी हेलपाटे मारताना दिसत आहेत.

जिल्हा रुग्णालयाकडे लस शिल्लक नसल्याने व ती कधी येईल याची माहिती नसल्याचे आरोग्य कर्मचारी सांगतात. यातच वाढत्या करोना रुग्णांमुळे शिर्डीतील करोना सेंटर हाऊसफुल्ल झाले असून औषधे व स्टाफचा मोठा तुटवडा जाणवत आहे.

ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. करोना सेंटर पूर्ण क्षमतेने चालू केल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध न करताच गृह विलगीकरण सुविधा बंद केल्याने रुग्णांची परवड होऊ लागली आहे.

सध्याची कोरोना परिस्थिती पाहता महसूल, आरोग्य प्रशासन व साई संस्थान प्रशासनाने संयुक्तपणे उपाययोजना करण्याची गरज असून आवश्यक औषधसाठा, लागणारे साहित्य तसेच डॉक्टर व इतर स्टाफ तसेच व्हेंटीलेटर तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe