अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील नगर तालुका बाजार समितीमध्ये अनेक घोटाळ्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत. 2018 पासून बाजार समितीची दोन चौकशी समित्यांमार्फत चौकशी सुरु आहे. याच चौकशी समितींच्या अधिकार्यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे.
त्याच अनुषंगाने सरकारने बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर विरोधकांनी विविध मुद्यांवर आक्षेप घेतले आहे.

या मुद्यांची चौकशी समितीने चौकशी करुन अहवाल दिला आहे. अहवालात बाजार समितीचा गैरकारभार चव्हाट्यावर आल्याने राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमन अन्वये नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नगर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने बाजार समितीतील गैरकारभार थांबवावा, यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. परंतु, बाजार समितीतील गैरकारभार थांबला नाही.
कर्मचारी भरती, प्रॉव्हिडंड फंड, कर्ज, गाळे विक्री तसेच बांधकाम याबाबत तक्रारी केल्या होत्या. याबाबत दोन वेळा चौकशी समिती नेमण्यात आली होती. दोन्ही समितीने अहवाल दिले आहेत.
त्यात अनेक मुद्यांवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात नावलौकिक असलेली बाजार समिती डबघाईला जाण्याची चिन्हे आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम