SIP Calculator: गुंतवणूकदार होणार मालामाल! 10 हजारांच्या SIP मधून मिळणार 10000000 रुपये ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Published on -

SIP Calculator:   तुम्ही देखील तुमच्या भविष्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असलातर आम्ही तुम्हाला सांगतो आजच्या काळात तुमच्यासाठी SIP हा बेस्ट पर्याय आहे. SIP मध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी वेळेत जास्त नफा कमवू शकतात.

सध्या शेअर मार्केटचा विचार केला तर आज शेअर मार्केट तेजीत आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला SIP च्या एका भन्नाट योजनेबद्दल महिती देणार आहोत. या योजनेत तुम्ही तब्बल 1 कोटी रुपयांचा परतवा प्राप्त करू शकतात . चला तर जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो  AMFI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 13041 कोटींची विक्रमी SIP करण्यात आली. सप्टेंबरमध्ये 12976 कोटींची एसआयपी करण्यात आली. मात्र, गेल्या महिन्यात इक्विटी फंडातील गुंतवणुकीचा आकडा कमी झाला आणि एकूण 9390 कोटींची गुंतवणूक झाली. सप्टेंबरमध्ये इक्विटी फंडांमध्ये एकूण 14500 कोटींची गुंतवणूक आली.

10 हजारांची SIP 1 कोटी होईल

जर तुम्हाला फक्त 12% वार्षिक परतावा मिळत असेल, तर 10 हजारांची SIP पाच वर्षांत 8.16 लाख, 10 वर्षांत 23 लाख, 15 वर्षांत 50 लाख आणि 20 वर्षांत 1 कोटी होईल. जर तुमचे वय 20-30 वर्षे असेल, तर निवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने दर महिन्याला 10 हजारांची गुंतवणूक करता येते. निवृत्तीच्या वेळी एवढी रक्कम मिळेल, ज्यामुळे संपूर्ण आयुष्य आरामात व्यतीत होईल.

 SIP चे 5 मोठे फायदे

1 नियमित गुंतवणूक दीर्घकालीन फायदेशीर आहे.

2  बाजारातील चढ-उतार लक्षात घेता फायदेशीर.

3  SIP गुंतवणुकीत जोखीम कमी ठेवते.

4  एसआयपी चक्रवाढीचा लाभ देते.

5 एसआयपी उद्दिष्टे साध्य करणे चांगले.

MF SIP: The dream of buying a house will come true

SIP गुंतवणुकीत 30% वाढ

गुंतवणूकदारांना SIP चा चक्रवाढ फायदा चांगला समजला आहे, त्यामुळे मे 2022 पासून दरमहा 12 हजार कोटींची SIP सतत केली जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यांत, SIP ने 30% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. 2021 मध्ये, एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान SIP गुंतवणूक 67 हजार कोटी होती. 2022 मध्ये याच कालावधीत 87 हजार कोटींची एसआयपी करण्यात आली होती.

हे पण वाचा :-  Organ Doantion : ‘अमर’ ठरला अनमोल ! 23 वर्षीय तरुणाने दिले 5 जणांना नवजीवन ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe