Small Business Idea : कमी खर्चात सुरु करा केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय ! दरमहा होईल बक्कळ कमाई

Ahmednagarlive24 office
Published:
Small Business Idea

Small Business Idea : आजकाल अनेकजण नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहेत. कमी गुंतवणूक करून त्यामधून बक्कळ पैशांची कमाई करण्याची स्वप्ने अनेकजण पाहत आहेत. तुम्हीही कमी खर्चात एक चांगला व्यवसाय सुरु करू शकता.

तुम्ही कमी खर्चात केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय कोणत्याही गावात, शहरात किंवा इतर ठिकाणी सहज सुरु केला जाऊ शकतो. या व्यवसायातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

तुम्ही केळीच्या झाडाची साल किंवा केळीच्या सालीचा कागद बनवू शकता. बाजारातील इतर कागदांच्या तुलनेत केळीच्या कागदात कमी घनता, उच्च शक्ती, उच्च नियोजित क्षमता आणि उच्च तन्य शक्ती असते.

केळीपासून कागद तयार करण्यासाठी किती खर्च येईल?

KVIC च्या अहवालानुसार केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 16.47 लाख रुपये खर्च येतो. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून सर्व पैसे गुंतवणूक करण्याची गरज नाही. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 11.93 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येत आहे. बाकीचे पैसे तुम्हाला खिशातून खर्च करावे लागतील.

तुम्ही पीएम मुद्रा योजनेतून कर्ज घेऊ शकता

केंद्र सरकारकडून छोट्या व्यवसायिकांसाठी अनेक कर्ज योजना सुरु केल्या आहेत. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा फायदा देखील तुम्ही हा व्यवसाय सुरु करण्यासाठी घेऊ शकता. ग्रामीण भागात बिगर कॉर्पोरेट लघुउद्योग करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

केळीपासून कागद बनवण्याच्या व्यवसायात किती कमाई होईल?

तुम्ही केळीपासून कागद बनवण्याचा व्यवसाय सुरु केला तर तुम्हाला यातून वार्षिक 5 लाखांपेक्षा जास्त पैसे कमवू शकता. पहिल्या वर्षी सुमारे 5.03 लाख रुपयांचा नफा होईल. दुसऱ्या वर्षी 6.01 लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षी 6.86 लाख रुपये नफा होईल. दरवर्षी तुम्हाला या व्यवसायातून चांगला नफा मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe