फक्त 50 हजारात उभा राहणार स्वतःचा व्यवसाय; गाव असो की शहर कुठेही सुरु करता येतो ‘हा’ बिजनेस

अलीकडे सॉफ्ट टॉईजचे मार्केट वाढले आहे. लग्न, वाढदिवस, एनिवर्सरीसारख्या छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये सॉफ्ट टॉईज भेट म्हणून देण्याचा ट्रेंड वाढला आहे. व्हॅलेंटाईन डे मध्येही सॉफ्ट टॉईज भेट म्हणून देतात. लहान मुलांनाही हे सॉफ्ट टॉईज खूपच आवडतात. यासोबतच घर सजवण्यासाठी देखील या सॉफ्ट टॉईज चा वापर होतो. यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच तुम्हाला यातून चांगली कमाई होणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Small Business Idea

Small Business Idea : अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. पण कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाही. तसेच व्यवसायासाठी लागणारे भांडवल देखील अनेकांकडे नसते. दरम्यान, आज आपण अशाच लोकांसाठी एक भन्नाट बिजनेस प्लॅन घेऊन आलो आहोत. आज आपण अवघ्या 50 हजारात सुरू करता येणाऱ्या व्यवसायाची माहिती पाहणार आहोत.

काही लोकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी लाखों रुपयांचे भांडवल लागते असे वाटते. पण, प्रत्यक्षात असेही काही छोटे व्यवसाय आहेत जे की नाममात्र गुंतवणुकीत सुरू होऊ शकतात. खेळणी बनवण्याचा व्यवसाय देखील असाच एक जबरदस्त व्यवसाय आहे. सॉफ्ट टॉईज म्हणजे टेडी बियर बनवण्यासाठी कोणतीचं मोठी फॅक्टरी टाकावी लागत नाही.

तुम्ही घरबसल्या सॉफ्ट टॉईज बनवू शकता. अलीकडे सॉफ्ट टॉईजचे मार्केट वाढले आहे. लग्न, वाढदिवस, एनिवर्सरीसारख्या छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये सॉफ्ट टॉईज भेट म्हणून देण्याचा ट्रेंड वाढला आहे.

व्हॅलेंटाईन डे मध्येही सॉफ्ट टॉईज भेट म्हणून देतात. लहान मुलांनाही हे सॉफ्ट टॉईज खूपच आवडतात. यासोबतच घर सजवण्यासाठी देखील या सॉफ्ट टॉईज चा वापर होतो. यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच तुम्हाला यातून चांगली कमाई होणार आहे.

किती गुंतवणूक करावी लागणार ?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 40 ते 50 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागू शकते. विशेष म्हणजे हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातूनच सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेच दुकान किंवा गाळा विकत घ्यावा लागणार नाही. यामुळे हा व्यवसाय तुम्ही अवघ्या काही हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करू शकता.

व्यवसायासाठी दोन मशीन्स लागणार

हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला दोन मशीन खरेदी कराव्या लागतील. कापड कट करण्याचे मशीन आणि सॉफ्ट टॉय म्हणजे टेडी तयार करण्यासाठी शिलाई मशीन लागेल. तसेच यासाठी तुम्हाला काही रॉ मटेरियल खरेदी करावे लागणार आहे. सर्व प्रकारचे रॉ मटेरियल तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल. या व्यवसायासाठी तुम्हाला मशीन साठी 14 ते 15 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. तसेच पाच ते सात हजार रुपयाचा इतर खर्च करावा लागणार आहे.

कमाई किती होणार?

तुम्ही 35 ते 40 हजार रुपयांच्या रॉ मटेरियलपासून 60000 किमतीचे सॉफ्ट टॉईज बनवू शकता. म्हणजे 40 हजाराचा खर्च केल्यास तुम्हाला 20000 रुपयाचा नफा राहणार आहे. तुम्ही जेवढे अधिक सॉफ्ट टॉईज बनवणार आणि विक्री करणार तेवढेच तुम्हाला अधिक पैसे मिळणार आहेत. यामुळे व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला मार्केटिंग कडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe