Small Saving Schemes : खुशखबर! सरकारने केली व्याजदरात वाढ, आता ‘या’ योजनांमधून होणार चांगली कमाई

Ahmednagarlive24 office
Published:

Small Saving Schemes : आता लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे. कारण केंद्र सरकारने एप्रिल-जून 2023 या तिमाहीसाठी लहान बचत योजनांच्या व्याजदरात 0.70 टक्क्यांनी पर्यंत वाढ केली असून याबाबत वित्त मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे.

सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र, मासिक उत्पन्न बचत योजना, सर्व पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट,राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी खात्याच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे.

सरकारने मागील 9 महिन्यांत तिसऱ्यांदा छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता छोट्या बचत योजनांवर 4% ते 8.2% पर्यंत व्याज संबंधित गुंतवणूकदारांना मिळणार आहे. या अगोदर 1 जानेवारी रोजी सरकारकडून जानेवारी-मार्च तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवण्यात आले ​​होते.

जारी केले परिपत्रक

याबाबत वित्त मंत्रालयाकडून एका परिपत्रकात माहिती देण्यात आली आहे की एप्रिल-जुलै 2023 या तिमाहीसाठी या लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. 1 जानेवारी 2023 पासून, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र धारकांना 7.7 टक्के व्याजदर मिळणार आहे.

सध्याच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8 टक्क्यांऐवजी 8.2 टक्के व्याज मिळणार आहे. 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांवर व्याजदर 1 टक्क्यांवरून 5 टक्के पॉईंट्सपर्यंत वाढवले आहेत. तसेच मासिक उत्पन्न योजनेत 7.1 टक्क्यांऐवजी आता 7.4 टक्के व्याजदर दिला जाणार आहे.

केले जाते 3 महिन्यांनी व्याजाचे पुनरावलोकन

सरकार प्रत्येक 3 महिन्यांनी छोट्या योजना आणि बचतीवरील व्याजदरांचा आढावा घेत असते. अशा स्थितीत सप्टेंबर महिन्यात सरकार व्याजदरात वाढ करण्याची अशी अपेक्षा आहे. सरकार छोट्या योजनांवरील व्याज 0.50 वरून 0.75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनांचे व्याजदर निश्चित करण्याचे सूत्र 2016 च्या श्यामला गोपीनाथ समितीकडून देण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe