Smart LED Google TV : प्रत्येक घरात तुम्हाला स्मार्ट टीव्ही पाहायला मिळत असेल. मागणी वाढल्याने आता विविध स्मार्ट टीव्ही निर्मात्या कंपन्या आपले स्मार्ट टीव्ही लाँच करू लागल्या आहेत. परंतु त्यांच्या किमती जास्त आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका.
कारण आता तुम्ही गुगलचा 58 इंच टीव्ही 55% सवलतीसह सहज खरेदी करू शकता. तुम्ही आता गुगलचा iFF58U62 हा 58 इंचाचा टीव्ही Amazon च्या सेलमधून स्वस्तात खरेदी करू शकता. याची मूळ किंमत 85,990 रुपये आहे.

परंतु 55% सवलतीनंतर तो 38,999 रुपयांना मिळेल. यावर 4 हजार रुपयांचे कूपन डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरमध्ये टीव्ही 2,540 रुपयांनी स्वस्त होईल. तसेच 750 रुपयांपर्यंत अतिरिक्त बँक ऑफर मिळेल.
जाणून घ्या Google TV iFF58U62 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
कंपनीच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 58-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले पाहायला मिळेल. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश दरासह येत असून कंपनी या स्मार्ट टीव्हीमध्ये एजलेस डिझाइन आणि मायक्रो डिमिंग तंत्रज्ञान देत असून या स्मार्ट टीव्हीचा पाहण्याचा कोन 178 अंश आहे.
तसेच पिक्चर क्वालिटी सुधारण्यासाठी कंपनी या टीव्हीमध्ये AI पिक्चर इंजिन 2.0 उपलब्ध करून देत आहे. याशिवाय, या स्मार्टटीव्हीची चित्र गुणवत्ता सर्वोत्तम करण्यासाठी, त्यामध्ये HDR 10, 4K अपस्केलिंग आणि डायनॅमिक कलर एन्हांसमेंट देण्यात आला आहे.
शिवाय मजबूत ध्वनी आउटपुटसाठी, या 4K Google TV मध्ये 24 वॅट्सचा साउंड आउटपुट मिळेल. इतकेच नाही तर यात तुम्हाला डॉल्बी ऑडिओ सपोर्ट मिळेल, ज्यामुळे तुम्हाला घरी बसून सिनेमा हॉलची मजा घेता येईल. स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टटीव्ही 2 GB रॅम आणि 16 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायासह येतो.
हा टीव्ही 64-बिट क्वाड कोर प्रोसेसरवर काम करतो. कंपनी या स्मार्टटीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि डिस्ने हॉटस्टार सारखे अंगभूत अॅप्स देखील प्रदान करते. तर कनेक्टिव्हिटीसाठी, कंपनी या स्मार्ट टीव्हीमध्ये 1 USB पोर्ट, 3 HDMI पोर्ट, ब्लू रे प्लेयर्स, इन-बिल्ट Wi-Fi 2.4Ghz/5GHz आणि हेडफोन आउटपुट सारखे पर्याय उपलब्ध करून दिले आहे.













