Smart TV Offer : पुन्हा अशी संधी नाही! 45% सवलतीत खरेदी करा 55 इंच स्मार्टटीव्ही, जाणून घ्या ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
Smart TV Offer

Smart TV Offer : स्वस्तात स्मार्टटीव्ही खरेदी करू इच्छित असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला Amazon वर 45% पर्यंत सवलतीत 55 इंच ब्रँडेड स्मार्टटीव्ही खरेदी करता येतील त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. जाणून घ्या ऑफर.

सर्वात आनंदाची बाब म्हणजे या 55 इंच स्मार्ट टीव्हीवर OTT प्लॅटफॉर्म चालवता येतात. त्यांच्या रिमोटमध्ये हॉटकी बटणही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुम्ही हा टीव्ही अॅमेझॉनवरून खरेदी केला तर तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळतील.

सॅमसंग 138 सेमी (55 इंच) अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही ऑफर

जर तुम्हाला तुमच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा लक्झरी बेडरूममध्ये स्मार्टटीव्ही लावायचा असल्यास तुम्ही हा पर्याय निवडू शकता. हा सॅमसंग टीव्ही 4K निओ सीरिजचा असून हा अल्ट्रा एचडी दर्जाचा आहे. या स्मार्टटीव्हीची रचना खूपच पातळ आणि बेझल-लेस आहे.

यामध्ये डॉल्बी डिजिटल प्लस ऑडिओ, HDR, ऑटो गेम मोड, व्हॉईस असिस्टंट, 4K प्रोसेसर आणि अॅडजेक्टिव्ह साउंड सारखी शानदार फीचर्स दिली आहेत. OTT प्लॅटफॉर्मवर द्रुत प्रवेशासाठी हॉटकी रिमोट उपलब्ध असून कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये तीन एचडीएमआय पोर्ट, गेम कन्सोल पोर्ट, स्पीकर आणि यूएसबी पोर्ट कंपनीकडून ग्राहकांसाठी देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर या टीव्हीचा शक्तिशाली स्पीकर 20 वॅट्सचा आहे.

Redmi 139 सेमी (55 इंच) 4K अल्ट्रा HD Android स्मार्ट एलईडी टीव्ही ऑफर

रेडमीचा हा 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही तुम्हाला 4K अल्ट्रा HD गुणवत्तेचा पूर्ण आनंद देतो. या स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला तुमचे आवडते शो पाहता येतील. त्याची मोठी स्क्रीन तुम्हाला सिनेमा हॉलची अनुभूती देते. तुम्हाला हा टीव्ही सेटअप बॉक्स, गेम कन्सोल आणि HDMI शी देखील कनेक्ट करता येईल.

यात 30 वॅट्सच्या आउटपुटसह डॉल्बी ऑडिओ स्पीकर दिले आहे. तसेच यात आणखी स्मार्ट बनवण्यासाठी हॉटकीजसह रिमोट दिला आहे. याच्या साहाय्याने तुम्हाला एका क्लिकवर नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ यासारखे अॅप्लिकेशन्स चालू करता येईल.

LG 80 सेमी (32 इंच) HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही ऑफर

LG चा हा ३२ इंचाचा टीव्ही लहान ते मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही बेडरूममध्ये स्थापित करण्यासाठी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुम्ही LG चा हा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. तुम्ही सहजपणे स्मार्ट टीव्ही टेबलवर ठेवू शकता किंवा भिंतीवर देखील माउंट करू शकता.

स्पीकर 10 वॅट्सचा असून यात कंपनीकडून वेब ओएस, मल्टीटास्किंग, वाय-फाय स्क्रीन मिररिंग आणि एचडीआर सारखी अनेक शानदार फीचर्स दिली आहेत. तुमच्या सोयीसाठी यामध्ये अलेक्सा सपोर्टही उपलब्ध असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe