Smart TV Offer : सध्या अनेक इ- कॉमर्स साइट्सवर वेगवेगळ्या ऑफर्स सुरु आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आली आहे.
कारण Amazon India तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही Xiaomi चा MI 80 cm (32 inches) 5A Series HD Ready Smart Android LED TV L32M7-5AIN जवळपास निम्म्या किमतीत खरेदी करू शकता.
या Xiaomi टीव्हीची MRP 24,999 रुपये आहे. Amazon च्या स्पेशल डीलमध्ये 48% च्या डिस्काउंट नंतर 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. टीव्ही खरेदी करणार्या Amex क्रेडिट कार्ड धारकांना EMI व्यवहारांवर रु. 1,500 पर्यंत त्वरित सूट मिळेल.
वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन
टीव्हीमध्ये, कंपनी 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनसह 32-इंच HD रेडी डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. चित्राचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी व्हिव्हिड पिक्चर इंजिन देखील त्यात आहे.
Xiaomi चा हा TV 1 GB रॅम आणि 8 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या टीव्हीमध्ये क्वाड-कोर कॉर्टेक्स ए३५ चिपसेट देत आहे. शक्तिशाली आवाजासाठी, Xiaomi च्या या टीव्हीमध्ये तुम्हाला 20-वॉट स्पीकर सिस्टम मिळेल.
ऑडिओ गुणवत्ता थिएटर सारखी बनवण्यासाठी, त्यात डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस व्हर्च्युअलसह डीटीएस एचडी देखील आहे. टीव्हीमध्ये, तुम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI, 2 USB पोर्टसह ड्युअल बँड Wi-Fi देखील मिळेल.
हा टीव्ही Android TV 11 वर काम करतो. यासोबतच तुम्हाला पॅचवॉल आणि IMDb इंटिग्रेशन देखील मिळेल. Xiaomi च्या या TV ची खास गोष्ट म्हणजे यात Netflix, Prime Video आणि Disney + Hotstar अॅप इनबिल्ट मिळेल.