Smart TV Offers : मागच्या काही दिवसांपासून भारतीय बाजरात आता स्मार्ट टीव्हीची मागणी झपाट्याने वाढत आहे. स्मार्ट टीव्हीवर आता लोक नवीन नवीन चित्रपट आणि शो तसेच वेब सीरिजचा आनंद घेत आहे. तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या रिलायन्स डिजिटल या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक भन्नाट ऑफर सुरु आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही 1,29,990 रुपये किमतीचा TCL स्मार्ट टीव्ही 65 टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
काय आहे ऑफर
TCL च्या 55-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 1,29,990 रुपये आहे. हा स्मार्ट टीव्ही रिलायन्स डिजिटल या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिथे TCL 4k स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 65 टक्के इतकी मोठी सूट दिली जात आहे. यानंतर, स्मार्ट टीव्हीची किंमत 44,990 रुपये राहिली आहे. अशाप्रकारे स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 85,000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. तसेच, 2,169 रुपयांच्या मासिक ईएमआयवर स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल.
3 वर्षांची वॉरंटी
TCL 55 Inch UHD 4K Android Smart चा मॉडेल क्रमांक 55C715 आहे. हा QLED TV स्मार्ट टीव्ही आहे. या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 3 वर्षांची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय, सर्व्हिसिंगची अतिरिक्त वॉरंटी दिली जात आहे. तुम्हाला TCT 55 इंच स्मार्ट टीव्ही आवडत नसल्यास, तो 7 दिवसांच्या आत परत केला जाऊ शकतो.
तपशील
टीसीएलच्या 55 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये यूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, गुगल कास्ट या सेवा दिल्या जातील. तसेच, स्मार्ट टीव्ही अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टसह येईल. टीव्ही बिल्ड-इन क्रोम-कास्ट सपोर्टसह येतो. यात 3 HDMI आणि 2 USB पोर्ट आहेत.
हे पण वाचा :- Bay Leaf Upay: आता संपूर्ण इच्छा होणार पूर्ण ! फक्त तमालपत्राचा करा असा वापर