रोहित्र मिळत नसल्याने स्नेहलता कोल्हे यांचा महावितरण कार्यालयात ठिया

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोरोना महामारीच्या काळात आर्थिक संकटाला शेतकरी बांधव सामोरे जात असतांना महावितरण शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणत आहे.

बिले भरूनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्याने भाजपच्या प्रदेश सचिव,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. कोपरगाव येथील महावितरणच्या कार्यालयात कोल्हे यांनी उपस्थित सहायक अभियंता दिनेश चावडा यांना मतदार संघातील रोहित्रा अभावी होत असलेल्या नुकसानासंदर्भात धारेवर धरले.

यावेळी विविध गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कोल्हे म्हणाल्या, सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. पावसाने ओढ दिली आहे. विहीरीच्या पाण्यावर जनावरांच्या चाऱ्यांसह इतर पिकांची लागवड केली आहे.

आर्थिक परिस्थिती नसतांनाही पिके उभी केली, परंतु महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे हाती आलेली पिके वाया जात आहे. वीजबिले भरूनही रोहित्र बसविण्यास टाळटाळ केली जात आहे. अधिकारी विद्युत रोहित्र वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोपही कोल्हे यांनी यावेळी केला.

ब्राम्हणगाव येथील वाकचौरे डी.पी. गेल्या एक महिन्यापासून जळालेली आहे. मागणी करूनही दुरूस्ती केली जात नाही, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता मुळे यांचेशी संपर्क साधून रोहित्र तातडीने बसवून देण्याची मागणीही कोल्हे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe