BSNL : ग्राहकांना BSNL ने दिला मोठा झटका, बंद केले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

BSNL : सर्व टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व जास्तीत जास्त ऑफर्स असणारे रिचार्ज प्लॅन्स जाहीर करत असतात. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीने काही स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले होते.

परंतु, आता या कंपनीने हे प्लॅन्स कायमचे बंद केले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना धक्का बसला आहे. कंपनीचे हे सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त प्लॅन्स होते. हे प्लॅन्स कोणते होते जाणून घेऊयात.

हे प्लॅन्स केले बंद

275 रुपयांचा प्लॅन 

बीएसएनएलच्या या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये दीर्घ वैधता आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध होती. BSNL च्या रु. 275 च्या दोन्ही प्लॅनसह, एकूण 3.3TB डेटा 75 दिवसांच्या वैधतेसह मिळत होता.

यापैकी 275 रुपयांच्या एका प्लॅनमध्ये 30Mbps इंटरनेट स्पीड तर दुसऱ्या प्लॅनमध्ये 60Mbps इंटरनेट स्पीड उपलब्ध होता. तसेच कंपनीने या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग दिले होते. परंतु, या योजनेसोबत OTT सेवा उपलब्ध नव्हती.

775 रुपयांचा प्लॅन 

बीएसएनएलच्या 775 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 75 दिवसांची वैधता उपलब्ध होती. कंपनीने प्लॅनमध्ये 100Mbps च्या स्पीडने इंटरनेट सुविधा दिली होती. वापरकर्त्यांना 3300 TB एकूण हाय-स्पीड डेटाचा लाभ आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध होते.

या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये Zee5, Voot, Yupp TV, Disney+ Hotstar, Shemaroo, Lionsgate आणि Hungama चे OTT फायदे उपलब्ध होते. परंतु, आता हे प्लॅन्स काढून टाकले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe