अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News : आपण अनेकदा शेतजमीन किंवा संपत्तीच्या कारणावरून भावाभावात वादविवाद झालेले पाहिले आहेत. काही वेळा याच कारणावरून एकमेकांचा खून देखिल केल्याच्या घटना घडल्या आहेत.
परंतु शेवगाव तालुक्यात भाऊ काही काम करत नसल्याच्या करणातून मोठ्या भावाने चक्क लहान भावाचा खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील संदीप शिवाजी काळे व त्याचा भाऊ संभाजी शिवाजी काळे हे दोघे मिळून राहत होते.
मात्र मोठा भाऊ संभाजी हा घरी काही काम करीत नव्हता, तो बाहेर कोठे कामाला गेला तरी घरी पैसे देत नव्हता म्हणून या दोघात नेहमी वाद होत असे.
गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर संदीप अंगणात खाटेवर झोपला होता. रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास काहीतरी जोरात मारल्याचा आवाज आल्याने पाहिले असता
मोठा भाऊ संभाजी हा हातात ट्रॅक्टरची लोखंडी स्टॅप्लिंग घेऊन संदीप याच्या डोक्यावर जोर जोराने मारत होता. त्याच्या हातातून स्टॅप्लिंग त्याच्या आईने हिसकावून घेतली.
संदीप हा डोक्यात मारहाण झाल्याने रक्तबंबाळ झालेला होता, त्यास उठवण्याचा प्रयत्न केला ; परंतू तो काही हालचाल करीत नव्हता.
घटनेनंतर संभाजी याने घरात जाऊन जेवण केले व कपडे बदलून संदीप याचा मोबाईल घेऊन पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.