म्हणून ‘त्या’ तरुणाने हातावर गोंदला आमदार रोहित पवार यांचा चेहरा!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  आपण नेते आणि त्यांचे कार्यकर्ते, चाहते, समर्थक यांचे अनेक किस्से ऐकले आहेत.

आपल्या लाडक्या नेत्याच्या सभांना आवर्जुन उपस्थित राहणे, आता सोशल मीडियाच्या जमान्यात त्यांच्या पोस्ट शेअर करणे, डीपीला त्यांचे फोटो ठेवणे असे अनेकजण तर आपल्या आवडत्या नेत्याचा फोटो, नाव असलेले शर्ट, जॅकेट्सही घालतात.

पण एका चाहत्याने मात्र चक्क त्याच्या आवडीच्या आमदाराचा चेहरा चक्क आपल्या हातावर गोंदवून घेतला आहे.तो देखील दुसऱ्या मतदारसंघातील, हे विशेष.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा चाहता असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पांडुरंग कोरे याने रोहित पवार यांचा चेहरा आपल्या हातावर गोंदवून घेतला आहे.

रोहित पवारांनी त्याच्या आपल्यावरच्या प्रेमाची दखल घेत त्याची भेट घेतली.

तसंच सोशल मीडियावर त्यांनी पांडुरंगबद्दल एक पोस्टही लिहिली असून यात त्यांनी नमूद केले आहे की, कार्यकर्त्यांच्या या प्रेमाबाबत आदरच आहे, पण कार्यकर्त्यांनी लोकहिताची अधिकाधिक कामं केली तर मला अधिक आनंद होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!