अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा पात्रात वाळू तस्कर चप्पूच्या सहाय्याने वाळू काढून साठवून ठेवलेल्या वाळूच्या ठिकाणी तहसीलदार व त्यांच्या पथकाने छापा मारला आहे.
यावेळी कडीत व मांडवे या ठिकाणी जमा केलेली 18 ब्रास वाळू जप्त करण्यात आलेली आहे. तसेच या वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, घटनास्थळी वाळू तस्कर थर्माकॉलच्या कागदाची होडी व पूल तयार करुन वाहत्या पाण्यातून वाळू काढण्याचा सपाटा चालला असल्याची माहिती त्यांना कळाली.
त्यानुसार श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांच्या सहकारी पथकाने दुपारपासून प्रवरा नदी पट्ट्यात कारवाईचे सत्र सुरु केले. त्यानुसार कडीत, मांडवे, उक्कलगाव या परिसरात प्रवरा नदीच्या किनाऱ्यावर छापा टाकला.
या छापा सत्रात तहसीलदार पाटील यांच्या पथकाने 1 डम्पर पकडला तसेच त्यानंतर कडीत येथून 4 साठे, मांडवे येथून 3 असे 7 तर उक्कलगाव येथून काही साठे असे 11 साठे मिळून 18 ब्रास वाळू जप्त केली.
जप्त केलेल्या वाळूवर दंडाची आकारणी करुन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम