Gold Price Today : मागील काही दिवसापासून रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध (War) यामुळे अर्थकारण पूर्णपणे ढवळून निघाला आहे. दैनंदित जीवनातील महत्वाच्या गरजेंवर युद्धाचा परिणाम झालेला आहे. अशातच सोने-चांदीचे भाव देखील आता गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या १ आठवड्यात सोन्याचा दर (Gold Rate)दहा ग्रॅममागे ४००० रुपयांनी वाढला आहे. याबाबतचे तज्ज्ञांचे (experts) काय मत आहे, याबाबत जाणून घेऊया.
सोन्याच्या बाजारातील तज्ज्ञांच्या मते रशिया-युक्रेन वाद आणखी काही काळ चिघळला तर सोन्याचा दर ५६,००० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर जाऊ शकतो.
अशा परिस्थितीत, खरेदीचा फायदा घेण्याची वेळ आली आहे की नाही हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तसे पाहता, ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने ५६,२०० रुपये प्रति दहा ग्रॅम हा सर्वाधिक उच्चांक गाठला होता.
सोन्याच्या दराबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, सध्या सोन्याचा दर ५३ हजार रुपयांच्या वर चालला आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करून काही वेळात नफा मिळवता येतो.
मात्र यासाठी सोने कसे खरेदी करायचे हे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर या वेळी आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर लक्ष ठेवा, असे या तज्ज्ञांचे मत आहे. कारण कोणत्याही बातमीमुळे सोन्याचा दर वेगाने वर-खाली होऊ शकतो.
जर तुम्हाला सोन्याची खरेदी आणि विक्री वेगाने करायची असेल, तर डिजिटल सोने (Digital gold) हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. ९९९ टक्के शुद्धतेचे सोने येथे उपलब्ध आहे.
अर्धा ग्रॅम पासून ते कोणत्याही प्रमाणात खरेदी केले जाऊ शकते. तसेच कोणतीही खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते. सोन्याच्या वेगाने वर-खाली होत असलेल्या दरामध्ये, डिजिटल सोन्याचे माध्यम सर्वोत्तम आहे. इथे सोन्याचा दर बाजारानुसार चढत राहतो. अशा परिस्थितीत, खरेदी आणि विक्रीचा निर्णय त्वरित घेण्यास मदत होते.
रशिया-युक्रेन संकटाने इक्विटी मार्केटला धक्का दिला आहे आणि तेलाच्या किमती १४ वर्षांच्या उच्चांकावर गेल्या आहेत, ज्यामुळे आधीच उच्च चलनवाढीवर आणखी दबाव आला आहे. तसेच युक्रेनमधील युद्ध थांबण्याची चिन्हे ही दिसत नाहीत.