Social Media Viral News : ,मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये देशात लवकरच दोन हजाराच्या नोटा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच दोन हजाराच्या नोटाच्या जागी पुन्हा भारतात एक हजाराची नोट सुरु होणार असल्याची माहिती या मेसेजमध्ये देण्यात आली आहे.
त्याचबरोबर दोन हजाराच्या नोटा बँकांमध्ये परत येणार आहेत. यादरम्यान सर्वसामान्यांना नोटा बदलून घेण्यासाठी फक्त 50 हजार रुपये जमा करण्याची परवानगी असेल. त्यासाठी केवळ दहा दिवसांचा अवधी दिला जाणार आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त दोन हजाराच्या नोटा आपल्याकडे ठेवू नका अशीही या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने या मेसेजची तपासणी केली असता, हा मेसेज पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. हा मेसेज फॉरवर्ड करू नका.
भारत सरकारकडून असा कोणताही मेसेज आलेला नाही. हा मेसेज पीआयबी फॅक्ट चेकने शेअर केला आहे. यामध्ये लवकरच या दोन हजारांच्या नोटा बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याऐवजी एक हजाराच्या नोटा घेतल्या जातील.
सोशल मीडिया पर वायरल वीडियों में दावा किया जा रहा कि 1 जनवरी से 1 हजार का नया नोट आने वाले हैं और 2 हजार के नोट बैंकों में वापस लौट जाएंगे। #PIBFactCheck
▶️ये दावा फर्जी है।
▶️कृपया ऐसे भ्रामक मैसेज फॉरवर्ड ना करें। pic.twitter.com/rBdY2ZpmM4
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 16, 2022
पीआयबीचे म्हणणे आहे की लोकांनी मेसेज पुढे शेअर करू नये. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. 2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. यासाठी लोक एटीएमबाहेर रांगा लावत होते. हा मेसेज पाहून लोकांना नोटाबंदीचे ते दिवस आठवतात.
हे पण वाचा :- Realme Smartphone Offer : यापेक्षा स्वस्त काहीही नाही! ‘इतक्या’ कमी किमतीत खरेदी करा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन