Car Parts Replacement : जर तुमच्याकडेही तुमची कार असेल तर तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कारण अनेकजण कार खरेदी केल्यानंतर फक्त काही महिने तिची देखभाल करतात. त्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु असे करणे घातक आहे.
जर तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुम्ही खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकता. कार घेतल्यानंतर तिच्या काही पार्ट्सकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर ते खराब झाले असतील तर वेळीच त्यांना बदलून टाकावे. काहीवेळेस यामुळे तुम्हाला खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.
ब्रेक पॅड
कारमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो ब्रेक. कार थांबवण्यासाठी ब्रेक्सचे नीट काम करणे खूप महत्त्वाचे आहे. सतत ब्रेक वापरल्यामुळे ब्रेक लावत असताना आवाज येतो. कारचे ब्रेक पॅड पूर्णपणे जीर्ण झाल्यास असा आवाज येतो. तज्ञांच्या मतानुसार, कारचे ब्रेक पॅड हे 30 ते 50 हजार किलोमीटरवर बदलावे. तसेच त्यांनी प्रत्येक सेवेची तपासणी करून घेतली पाहिजे. समजा जर तुमची कार ट्रॅफिकमध्ये खूप धावत असेल, तर ब्रेक पॅड त्वरीत बदलावे.
इंजिन ऑईल
इंजिन चालवण्यासाठी तेल खूप महत्त्वाचे आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे इंजिन ऑइल उपलब्ध आहे. त्यापैकी काही ऑइलचे आयुष्य 10 हजार किलोमीटरपर्यंत असते. समजा जर तुमची कार 8 ते 10 हजार किलोमीटर दरम्यान धावत तेव्हा उशीर न करता इंजिन ऑइल बदलावे. त्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढेल आणि अनावश्यक खर्च टाळला जाईल.
ऑइल फिल्टर