Sony Bravia X70L : सर्वात लोकप्रिय स्मार्ट टीव्ही निर्माता कंपनी सोनी सतत फीचर्ससह स्मार्ट टीव्ही लाँच करत असते. कंपनीचे सर्वच स्मार्ट टीव्ही हे बजेटमध्ये असतात. अशातच आता कंपनीकडून Sony Bravia X70L टीव्ही सीरिज लाँच करण्यात आली आहे.
कंपनीने या सीरिज अंतर्गत 43 आणि 50 इंचाचे दोन स्मार्ट टीव्ही लॉन्च केले आहेत. यात कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी X1 4K प्रोसेसर, लाइव्ह कलर टेक्नॉलॉजी तसेच X-Reality Pro यांसारखी भन्नाट फीचर्स दिली आहेत.
जाणून घ्या Sony Bravia X70L चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
कंपनीचा आगामी Sony Bravia X70L मध्ये X1 4K पिक्चर प्रोसेसर असून जो आवाज कमी करण्यासाठी प्रगत अल्गोरिदम वापरतो. यामध्ये कंपनीकडून 4K X-Reality Pro तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे, जे पूर्ण HD आणि 2K सामग्री 4K वर वाढवते. याशिवाय, यात Motionflow XR दिला आहे. या टीव्हीमध्ये स्लिम बेझल्स असून तो स्लिमलाइन स्टँडसह येतो.
Sony Bravia X70L टीव्ही सीरीज ही Apple Home Kit आणि AirPlay च्या समर्थनासह Google TV OS वर चालते. या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 20W ओपन-बॅफल स्पीकर कंपनीने दिले आहेत. इतकेच नाही तर हा टीव्ही रिमोट व्हॉइस सक्षम असून Amazon Prime Video, Netflix, Disney+ Hotstar, Sony LIV आणि बरेच काही यांसारख्या अॅप्समध्ये प्रवेश करण्यासाठी 6 हॉटकीज असणार आहेत.
जाणून घ्या किंमत
कंपनीकडून Bravia X70L हे टीव्ही 43 आणि 50 इंच अशा दोन आकारात सादर करण्यात आले आहे. या टीव्हीची 43-इंच व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये इतकी आणि Bravia X70L 50-इंच व्हेरिएंटची किंमत 74,900 रुपये इतकी आहे. जर तुम्हाला हे टीव्ही खरेदी करायचे असतील तर नवीन Sony BRAVIA X70L टीव्ही सीरिज भारतातील सर्व सोनी केंद्रे, अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स पोर्टलवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.