Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. सोयाबीन पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेशात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते.
एकंदरीत सोयाबीन पिकावर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र यावर्षी सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत.

यावर्षी सोयाबीन पाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास विक्री होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधवांची गेल्या वर्षी प्रमाणे सोयाबीनला उच्चांकी बाजार भाव मिळण्याची आशा फोल ठरली आहे. दरम्यान आज सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो आज सोयाबीनच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा झाली आहे.
मित्रांनो आज देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. निश्चितच देवणी एपीएमसी मध्ये मिळालेला हा बाजार भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नसला तरीदेखील सोयाबीन बाजारभावात सुधारणा होत असल्याचे हे एक संकेतांक असल्याचे बोलले जात आहे.
मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5800 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून 5261 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे.
तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5205 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 50 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली.
आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, कमाल आणि सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
आष्टी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 280 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला 4200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून पाच हजार पन्नास रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4600 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 92 सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४७८० रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5502 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५१४१ रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.