अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- रशियातील पॅनेशिया बायोटेकने तयार केलेल्या ‘स्पुतनिक लाइट’ या सिंगल डोस लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे.
या लसीची गुणवत्ता आणि सुरक्षा तपासण्यासाठी लसीची पहिली खेप भारतात आली असून, हॉस्पिटलमध्ये ट्रायल साइट्स सेट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लवकरच या चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू होणार आहे. दरम्यान, द लॅन्सेटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटले आहे की, स्पुतनिक लाइट कोरोनाविरूद्ध 78.6 ते 83.7 टक्के प्रभावी आहे.
अर्जेंटिनातील 40 हजार वृध्दांवर याची चाचणी करण्यात आली आहे. या लसीमुळे रुग्णालयात दाखल होण्याची संख्या 82.1 वरुन 87.6 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. जुलैमध्ये या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागण्यात आली होती.
पण केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन, CDSCO) तज्ज्ञ समितीने ही मागणी नाकारली होती. भारतात या लशीचं ट्रायल झालं नाही, त्यामुळे याला परवानगी नाही देऊ शकत असं समितीने सांगितलं होतं.
आता या लशीच्या ट्रायलला परवानगी मिळाली आहे. मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार RDIF सांगितलं, सिंगल डोस स्पुतनिक लाइटचं 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान लसीकरण मोहिमेत ही लस वापरण्यात आली.
लस दिल्यानंतर 28 दिवसांनी डेटा तपासण्यात आला. त्यावेळी ही लस 79.4% प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. रशिया, यूएई, घाना आणि इतर देशांमध्ये या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यात आलं आहे. यात 7,000 लोकांचा समावेश होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम