अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कामगारांचा संप अद्यापही कायम आहे. सरकारी पातळीवरुन अनेक प्रयत्न करुनही संपावर तोडगा निघाला नाही. अशातच आज एसटी संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
मात्र या सुनावणीतही कोणताही तोडगा निघाला नसल्याने पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे. राज्य सरकारमध्ये विलीन करा अशी मागणी करत एसटी कर्मचारी गेल्या 20 दिवसांपासून संपावर आहेत.

आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य आहेत. मात्र, विलिनीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे विलिनीकरण सोडून बोला, अशीच काहीशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याचे दिसते आहे.
राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतूनही काही निष्पन्न झालं नाही. त्यावेळी कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा आता सुरू होत आहेत.
मग यावेळी खेडेगावातील विद्यार्थ्यांनी काय करायचं असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. एसटी कामगारांनी संप सुरू ठेवताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय याचाही विचार आंदोलकांनी करावा असं न्यायालयाने म्हटलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम