अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने हा संप मोडून काढण्यासाठी देखील प्रयत्न केला होता.
मात्र तो यशस्वी झाला नाही. एसटी कर्मचारी संपावर ठाम राहिले. मागील 15 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला यश आलं आहे.
सरकारने एक पाऊल पुढे येत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत कोर्टाने नेमलेल्या समितीच्या अहवालानंतरच घेण्यात येईल,
अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. असं असलं तरी संपकरी एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान, परबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एसटीतील चालकापासून ते लिपिकापर्यंत कुणाला किती पगारवाढ झाली हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
चालकाच्या पगारात अशी असेल वाढ ?
नवनियुक्त चालक – सध्याचे स्थूल वेतन 17 हजार 395 रुपये. त्यात आता 7 हजार 200 रुपयांची वाढ, सुधारित स्थूल वेतन आता 24 हजार 595 रुपये.
10 वर्षे पूर्ण झालेला चालक – सध्याचे स्थूल वेतन 23 हजार 40 रुपये. त्यात आता 5 हजार 760 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 28 हजार 800 रुपये.
20 वर्षे पूर्ण झालेला चालक – सध्याचे स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 41 हजार 40 रुपये.
30 वर्षे पूर्ण झालेला चालक – सध्याचे स्थूल वेतन 53 हजार 280 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 56 हजार 880 रुपये.
वाहकाच्या पगारात अशी असेल वाढ ?
नवनियुक्त वाहक – सध्याचे स्थूल वेतन 16 हजार 99 रुपये. त्यात आता 7 हजार 200 रुपयांची वाढ, सुधारित स्थूल वेतन आता 23 हजार 299 रुपये.
10 वर्षे पूर्ण झालेला वाहक – सध्याचे स्थूल वेतन 21 हजार 600 रुपये. त्यात आता 5 हजार 760 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 27 हजार 360 रुपये.
20 वर्षे पूर्ण झालेला वाहक – सध्याचे स्थूल वेतन 36 हजार रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 39 हजार 600 रुपये.
30 वर्षे पूर्ण झालेला वाहक – सध्याचे स्थूल वेतन 51 हजार 880 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 55 हजार 440 रुपये.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम