Business Idea : सध्या अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या कामगारांना घरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे अनेकजण व्यवसायाकडे वळू लागले आहेत. जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.
सर्वात महत्त्वाचे आणि आनंदाची बाब म्हणजे या व्यवसायासाठी जास्त भांडवलाची गरज नसते. तुम्ही हा व्यवसाय फक्त 15000 रुपयांमध्ये सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या गावात किंवा शहरात सुरु करू शकता. यातून तुमची वर्षभरात बंपर कमाई होईल.
खरं तर नैसर्गिक झाडूला एक विशेष महत्त्व आहे. परंतु, आता या झाडूचे अनेक प्रकार प्रचलित झाले आहेत. गवत, नारळ, खजुराची पाने, मक्याची भुसा इत्यादीपासून बनवलेले झाडू तुम्हाला बाजारात पाहायला मिळत असतील. झाडू त्या उत्पादनांच्या श्रेणीत येतो. ज्याची मागणी वर्षभर असते.
असा बनवा झाडू?
तसे पहिले तर साधारणपणे फक्त कारागीरच झाडू तयार करतात. परंतु, जर तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त झाडू बनवायचे असल्यास तुम्ही मशीन घेऊन झाडू बनवू शकता. तसेच तुम्ही ऑनलाइन शॉपिंग पोर्टलद्वारे किंवा मार्केटला भेट देऊन झाडू बनवण्याची मशीन निवडू शकता. झाडू अनेक प्रकारे बनवता येतो. तुम्हाला कोणत्या प्रकारचा झाडू बनवायचा आहे हे तुम्हीच ठरवा. यासाठी कच्चा माल म्हणून साधारणपणे झाडू हँडल कॅप, प्लास्टिक टेप, स्ट्रॅपिंग वायर इत्यादींची गरज आहे.
झाडूची मागणी
आपल्या देशात सिंक झाडू (कडक झाडू) आणि फ्लॉवर ब्रूम (सॉफ्ट ब्रूम) यांना झाडूंना सर्वात जास्त मागणी आहे.हे लक्षात घ्या की असे झाडू फक्त हाताने बनवले जातात. अगदी कमी जागेत तुम्ही झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. गाव असो की शहर, सगळ्या ठिकाणी याला मोठी मागणी आहे.
किती येतो खर्च आणि कमाई
तुम्ही 15,000 रुपयांमध्ये झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. याच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला 40000 रुपये सहज मिळू शकतील. तसेच, तुमच्या झाडूची गुणवत्ता जितकी चांगली असेल तितकी तुमची कमाईही चांगली होईल हे लक्षात ठेवा.