बाजारपेठ सुरु करा; व्यापाऱ्यांचे आयुक्तांना साकडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. यामुळे नगर शहरात मागील ६ एप्रिल पासून सर्व बाजारपेठ कोरोना मुळे बंद करण्यात आली आहे.

या बरोबर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजरपेठेमुळे त्यावर अवलंबून असणारे हजारो कामगार यांचेवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

आता नगर शहराची रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने कमी होत आहे. त्यासाठी आता मनपाने पुढाकार घेऊन बाजारपेठ सुरु करावी तसेच

सर्व नियम व अटींचे पालन करून त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शहर शिवसेना व शहरातील सर्व व्यापारी असोसिएशनच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे, एस झेड चोपडा ,निखिल नहार ,पोपट लोढा ,प्रसाद बोरा ,नवरत्न डागा ,तेजस डागा ,ईश्वर बोरा ,प्रतीक बोगावत ,प्रशांत मुथा ,मनोज काळे ,शेखर भंडारी आदी उपस्थित होते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe