Business Idea : अनेक दिग्ग्ज कंपन्या अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. त्यामुळे अनेकजण करत असलेली नोकरी सोडून व्यवसाय करू लागले आहेत. आणि प्रत्येक व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला पैसे जास्त गुंतवावे लागतातच असे नाही.
तुम्ही आता कमी खर्चात चांगला व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही एकदा व्यवसाय सुरु केली की तुम्ही काही व्यवसायातून महिन्याला हजारो किंवा लाखो रुपये कमवू शकता. असाच एक व्यवसाय आहे ज्याची सुरुवात तुम्ही केली तर 50-60 वर्षे चांगले पसे कमवू शकाल.
देशातील कॉफीचा दर्जा सर्वात चांगला मानला जात आहे मागच्या वर्षी भारताने 4 लाख टनांपेक्षा जास्त कॉफीची निर्यात केली होती. कॉफीची सर्वात जास्त मागणी रशिया आणि तुर्कीमधून आली आहे. भारताने आपल्या निर्यातीतून $1.11 बिलियनची कमाई नोंदवली आहे. खेप आणि प्रमाण या दोन्ही बाबतीत देशाने पूर्वीपेक्षा जास्त कॉफीची निर्यात केली आहे.
या आहेत भारतात उगवल्या जाणाऱ्या कॉफीच्या जाती
भारतातही चहासारखी कॉफी पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कॉफीचे अनेक प्रकार घेतले जात आहेत. देशातील केंट कॉफी ही सर्वात जास्त जुनी कॉफी मानली जात आहे. त्याचे उत्पादन केरळमध्ये सर्वात जास्त आहे. अरेबिका कॉफी ही उत्तम दर्जाची कॉफी मानली जात असून त्याचे उत्पादनही भारतातच करण्यात येते.
तसेच इतरही अनेक जाती भारतात उगवल्या जातात. हे लक्षात घ्या की खुल्या आणि उष्ण ठिकाणी कॉफीची लागवड करणे टाळावी. कारण त्याची लागवड केवळ सावलीच्या ठिकाणीच चांगले उत्पादन देते. याची चांगली गोष्ट म्हणजे कॉफीच्या लागवडीला जास्त सिंचनाची गरज नसते.
योग्य कालावधी
यासाठी समशीतोष्ण हवामान उत्तम असून तापमान 18 ते 20 अंशांपर्यंत सर्वोत्तम मानले जाते. तसेच त्याची पिके उन्हाळी हंगामात कमाल 30 अंश आणि हिवाळ्यात किमान तापमान 15 अंश सहन करू शकतात. हे देखील लक्षात ठेवा की तीव्र हिवाळ्यात त्याची लागवड करणे टाळावे. चिकणमाती जमिनीत कॉफीचे उत्पादन सर्वात जास्त होते. जून ते जुलै हा महिना पेरणीसाठी उत्तम मानला जातो.
नफा
समजा कॉफीचे पीक एकदा लावले की वर्षानुवर्षे उत्पादन मिळत राहते. अंदाजानुसार, त्याची पिके सुमारे 50 ते 60 वर्षे कॉफी बियाणे देत असतात. एक एकर क्षेत्रामध्ये सुमारे 2.5 ते 3 क्विंटल कॉफीच्या बिया तयार होतात. त्यामुळे तुम्ही या पिकाची लागवड करून बंपर कमवू शकतात.