Business Idea : कमी पैशांची गुंतवणूक करून नवीन वर्षात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, होईल बक्कळ कमाई

Ahmednagarlive24 office
Published:

Business Idea : अनेकजण नोकरी करून वैतागले आहेत. काहीजणांना तर आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. जर तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे.

या नवीन वर्षात तुम्हाला व्यवसायात फक्त 10,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या व्यवसायातून लाखो रुपये कमावू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा व्यवसाय कुठेही सुरु करू शकता.

बिंदी 16 अलंकारांपैकी एक असून काही दिवसांपूर्वी फक्त गोल आकाराच्या बिंदीला बाजारात मागणी होती. परंतु, आता बिंदीचे अनेक आकार आणि डिझाइन्स उपलब्ध आहेत.

बाजारात आहे मोठी मागणी

सध्या बिंदीचा व्यवसाय खूप मोठा झाला आहे. एका आकडेवारीनुसार, एक महिला एका वर्षात 12 ते 14 पॅकेट बिंदी वापरते. तुम्ही हा व्यवसाय 10,000 रुपये गुंतवून सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला कच्चा माल लागेल. त्यामध्ये मखमली कापड, चिकट गोंद, क्रिस्टल्स, मोती इत्यादी गरजेची असतील. या सर्व वस्तु सहज उपलब्ध होतात.

अशी बनवा बिंदी

या व्यवसायासाठी सुरुवातीला बिंदी प्रिंटिंग मशीन, बिंदी कटर मशीन आणि गमिंग मशीनची गरज असेल. तसेच इलेक्ट्रिक मोटार आणि हँड टुल आवश्यक आहे. तसेच तुम्ही मॅन्युअल मशिन्सच्या मदतीने हा व्यवसाय सुरु करू शकता. व्यवसाय वाढल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटन ​​मशिन्स घेऊ शकता.

इतके मिळवाल पैसे 

या व्यवसायात 50% पेक्षा जास्त बचत होते. जर तुम्ही उत्पादन योग्य प्रकारे विकले तर तुम्ही महिन्याला किमान 50 हजार रुपये कमवू शकता. या व्यवसायात मार्केटिंग भाग हा सर्वात महत्त्वाचा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe