Business Idea : नवीन वर्षात फक्त 5000 रुपयांमध्ये सुरु करा ‘हा’ व्यवसाय, होईल बक्कळ कमाई

Ahmednagarlive24 office
Published:

Business Idea : थोड्याच दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होईल. या वर्षात जर तुम्हाला तुमचा छोटासा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. तुम्ही गिफ्ट बास्केटचा व्यवसाय सुरु करू शकता.

विशेष म्हणजे या व्यवसायात खूप मोठ्या भांडवलाची आवशक्यता नाही. फक्त 5000 रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. 5000 रुपयांमध्ये तुम्ही बक्कळ कमाई करू शकता.

अनेकजण विशेष प्रसंगी गिफ्ट बास्केट खरेदी करतात. मार्केटमध्येही वाढदिवस, वर्धापनदिन आणि इतर शुभ प्रसंगी गिफ्ट बास्केटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

जाणून घ्या व्यवसायाबद्दल

या व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू देण्यासाठी बास्केट बनवल्या जातात. विशेष म्हणजे तुम्हीही या बास्केट घराच्या घरी बनवू शकता. वेगवेगळ्या प्रकारानुसार आणि किमतीनुसार या बास्केट तयार करू शकता.

वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्यांनी गिफ्ट बास्केट बनवायला सुरुवात केली आहे. यामध्ये काळानुसार खूप बदल झाले आहेत. हा व्यवसाय तुम्ही 5000 ते 8000 रुपयांमध्ये सुरू करू शकता.

या वस्तू असतील गरजेच्या

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर गिफ्ट बास्केट किंवा बॉक्स रिबनची गरज असेल. त्याचबरोबर रॅपिंग पेपर, हस्तकला वस्तू, सजावटीचे साहित्य, दागिन्यांचे तुकडे, पॅकेजिंग साहित्य, स्टिकर, फॅब्रिकचा तुकडा, पातळ वायर, कात्री, वायर कटर, मार्कर पेन, पेपर श्रेडर, कार्टन स्टेपलर, गोंद आणि कलरिंग टेप लागेल.

असे करा मार्केटिंग

तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करायचे असेल तर तुम्ही एक गिफ्ट बास्केट तयार करून नमुना म्हणून जवळच्या बाजारपेठेतील दुकानदारांना दाखवावी लागेल. तसेच तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवर मार्केटिंग करू शकता. हे लक्षात घ्या की गिफ्ट बास्केटची किंमत कमी ठेवली तर ती विकायला सोपी जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe