Health Tips : तुमच्यापैकी अनेकजण चहा पित असाल. परंतु, चहा आरोग्यासाठी खूप घातक असतो. तरीही अनेकजण दिवसातून 4 ते 5 वेळा चहा घेतात. या चहामुळे मळमळ आणि उलटीसारख्या समस्या जाणवतात.
अशातच आता चहाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही जर ग्रीन टी,ब्लॅक टी,आल्याचा चहा किंवा हिबिस्कस चहा घेतला तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल. या चहामुळे अनेक आजार दूर होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
ग्रीन टी
आरोग्याच्याबाबतीत ग्रीन टी हा खूप फायदेशीर असतो. कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल कर्करोग, टाइप-2 मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या दाहक आणि जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर असतात. अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक ग्रीन टीचे सेवन करतात त्यांना कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका हा खूप कमी असतो.
ब्लॅक टी
आरोग्यासाठी ब्लॅक टी सुद्धा खूप फायदेशीर असल्याचे अभ्यासात आढळले आहे. ब्लॅक टी चे सेवन संज्ञानात्मक घट, जळजळ, हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग रोखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. जे नियमितपणे ब्लॅक टी घेणाऱ्यांना स्मृतिभ्रंश सारखे न्यूरोलॉजिकल आजार होण्याचा धोका कमी असतो.
आल्याचा चहा
देशात आल्याचा चहा खूप प्रसिद्ध आहे. कारण यामध्ये लवंग, वेलची, काळी मिरी, तुळस आरोग्यासाठी चांगले असते. तसेच डोकेदुखी, पोटाच्या समस्या,मळमळ आणि उलट्यांवरआल्याचा चहा गुणकारी ठरतो.
हिबिस्कस चहा
वाळलेली हिबिस्कसची पाने आणि पाकळ्यांपासून बनवलेला हिबिस्कस चहाचा पारंपारिक औषधांमध्ये विशेष फायदा आढळून आला आहे. हा चहा सहा आठवडे नियमितपणे पिल्याने प्रौढांमध्ये रक्तदाब कमी होतो. त्याशिवाय हिबिस्कस हे पचन सुधारण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी ओळखला जातो.