आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; सत्ताधारी – विरोधक एकमेकांना भिडणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :-  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यातील ‘राजकीय बदला’ घेण्याच्या राजकारणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटतील.

आजपासून म्हणजेच 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

दरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली असून सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत विरोधकांचे हल्ले तितक्याच जोरकसपणे परतवून लावण्याचा निर्धार करण्यात आला.

त्याचवेळी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासह विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनेक घडामोडी घडत गेल्या आहेत. यावरूनच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे.

याच घडामोडींदरम्यान 3 मार्च ते 25 मार्च पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. महाविकास आघाडी सरकारचं हे तिसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.

अधिवेशनात गाजणार ‘हे’ मुद्दे

आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचारचे आरोप
नवाब मलिक यांचा राजीनामा
किरीट सौमय्यांवर झालेले आरोप
नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरील कारवाई
केंद्रीय यंत्रणांचा वापर
ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण
कोरोना काळातील भ्रष्टाचार
शेतकऱ्यांची वीजबील माफी
पीक विमा
12 निलंबीत आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रश्न
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा निलंबित प्रश्न
केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानुसार राज्य सरकार आता काय तरतुदी करते यावरून लक्ष ठेवून भाजप सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe