अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- 19 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांसाठी मोठा सण असलेला मोहरम साजरा केला जाणार आहे. रमजान ईद , बकरी ईद प्रमाणे शासनाने कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता मोहरमसाठी ही नियमावली जाहीर केली आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, इतर कार्यक्रमांप्रमाणे यावर्षी देखील मोहरम साध्या पध्दतीत पाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यंदा धार्मिक सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्याने, सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही, अशा सूचनाही देण्यात आले आहेत.
पण मुंबई उच्च न्यायालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास, याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी दिली आहे.
केवळ लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस झालेल्या भाविकांनाच ‘ताजिया’ मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी असेल, असं हायकोर्टानं स्पष्ट केले आहे. मात्र रस्त्यावरुन पायी मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे.
खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना
1.मातम मिरवणुका काढण्यास बंदी, घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळावा.
2.सोसायटीतील नागरिकांनाही एकत्रित दुखवटा करू नये. वाझ/मजलीस ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावेत
3.ताजिया/आलम काढू नये सबील/छबीलसाठी शासनाची परवानगी आवश्यक, बाटलीबंद पाणीच द्यावे लागणार.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम