अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- ब्रह्मवृंद वैभव वधुवर सुचक मंडळातर्फे सर्व शाखिय ब्राह्मन समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवारी ( ५ डिसेंबर) औरंगाबाद येथील कलश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
मेळावा ब्राह्मण समाजातील सर्व पोट जातींसाठी आहे. हा मेळावा सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत दोन सत्रात होणार आहे. मेळाव्यासाठी उच्चशिक्षित अल्पशिक्षित प्रथम वर वधू, उपवर मुला-मुलींनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
अपेक्षा व्यक्त करणे गरजेचे आहे. दुसऱ्या सत्रात मुला-मुलींना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. मेळाव्यात नोंदणीकृत असलेल्या वधूवरांची माहिती पुस्तिका काढण्यात येणार आहे.
उपवर मुलींची नोंदणी मोफत करण्यात येणार आहे. या मेळाव्याचा लाभ घटस्फोटीत, विधवा, विधूर, सापत्य, विनापत्य, अपंग प्रौढ वधूवर ही घेऊ शकता, असे आवाहन ब्रह्मवृंद वैभव सुचक मंडळा तर्फे करण्यात आले आहे.
या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दत्तात्रय पिंपळे, अश्विनी लोटांगणे, सुधीर देशपांडे, रामचंद्र अंधारकर,
देवीदास जोशी, पद्माकर नाईक, रवी कुलकर्णी यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी ९४०३९२२८६२ आणि ९०११६२६३१५ या वर संपर्क साधावा.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम