Electric Vehicles : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी 900 ई-चार्जिंग स्टेशन्स स्थापन करणार आहेत.
यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल, कारण त्यांना त्यांचे वाहन चार्ज करण्यासाठी सुलभ उपलब्धता असेल.

खरं तर, सरकारी तेल कंपन्यांनी तामिळनाडूमध्ये ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन ऑइलने तामिळनाडूमध्ये आधीच 133 ई-चार्जिंग स्टेशन स्थापित केले आहेत आणि चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणखी 400 ई-चार्जिंग स्टेशन स्थापित करण्याची त्यांची योजना आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियमची राज्यात 79 ई-चार्जिंग स्टेशन आहेत आणि ते आणखी 175 ई-चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत. त्याचप्रमाणे, भारत पेट्रोलियम चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणखी 145 ई-चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे.
इंडियन ऑइलच्या एका अधिकाऱ्याने IANS ला सांगितले की, ई-चार्जिंग स्टेशनची संख्या वाढल्याने इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढेल. ई-चार्जिंग स्टेशनमुळे लोक प्रवासादरम्यानही त्यांच्या वाहनाची बॅटरी चार्ज करू शकतील.
ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एक कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले. महामार्गावर जलद चार्जिंगची व्यवस्था आहे तर शहरांमधील चार्जिंग स्टेशन्समध्ये स्लो चार्जिंग होते. चार्जिंग चार्जेस डीलर स्वतः ठरवतात.