शेवगावातील स्थानिक टपरीधारकांचे झेडपीच्या सीईओना निवेदन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- शेवगाव येथील जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावे,

या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना दिले.

शेवगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या अनेक वर्षांपासून स्थापन करण्यात आलेली असून त्यालगत चारही बाजूने टपरीधारक विविध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.

या सर्व टपरीधारकांकडून अधिकृतरित्या नगरपरिषदेला कर पावतीचा प्रतिदिन भरणा केला जात आहे. या शाळेसह प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव यापूर्वीच जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला होता.

मात्र तो प्रस्ताव तसाच प्रलंबित राहिला. 14 जून 2021 रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची), जिल्हा परिषद शाळा उर्दू, पंचायत समिती,

प्राथमिक आरोग्य केंद्र पैठण रोड आदी सर्व ठिकाणच्या जागा 99 वर्षाच्या करारावर देण्याची मागणी अधिकारी व पदाधिकार्‍यांमधून झाली. या निर्णयाने धनदांडग्यांचा फायदा होऊन सर्वसामान्य टपरीधारकांचे नुकसान होणार असल्याने

जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी या मागणीला विरोध दर्शविला. या प्रस्तावास सर्व टपरी धारकांचा देखील विरोध आहे. त्यामुळे संबंधित परिसरात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावे अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe