शेअर बाजारात पडझड सुरूच ! आज ‘या’ शेअर्सवर नजर ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- जगभरातील शेअर बाजारांमधील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यांपासून विक्रीचा सपाटा सुरु आहे. एकाच सत्रात बाजार तब्बल 3 टक्क्यांहून अधिक घसरून 57 हजारावर पोहचला आहे.

यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. दरम्यान काल आठवड्याच्या सुरुवातीला बाजार बंद होण्याच्या वेळेस सेन्सेक्स 1545.67 अंकांनी म्हणजेच 2.62 टक्क्यांनी घसरून 57,491.51 वर बंद झाला.

दुसरीकडे, निफ्टी 468.05 अंकांनी अर्थात 2.66 टक्क्यांनी घसरून 17,149.10 वर बंद झाला. आगामी फेड बैठकीपूर्वी कमकुवत जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम दिसून आला आणि त्यामुळेच बाजारात मोठी घसरण झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले.

या घसरणीचा सर्वात मोठा बळी नव्या टेक्नोलॉजीवर आधारित शेअर्सना बसला. यामध्ये, FII ने मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती.

या शेअर्सवर लक्ष असू द्या…

– जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

– बजाज फायनान्स (BAJFINANCE) –

टाटा स्टील (TATASTEEL)

– ग्रासिम (GRASIM)

– हिंदाल्को (HINDALCO)

– अॅस्ट्रल (ASTRAL)

– गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

– झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL) –

आयडिया (IDEA)

– एनआयआयटी टेक्नोलॉजीज (COFORGE)