LIC : मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडा!! LIC च्या ‘या’ योजनेचा होईल मोठा फायदा

LIC : प्रत्येकाला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असते आणि काळजी वाटणे स्वाभाविक आहे. तुम्ही आता तुमच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या योजनेत गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता.

तसेच यात इतर अनेक फायदेही मिळू शकतात. एलआयसीची आता जीवन तरुण योजना तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खूप चांगली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना विमा संरक्षण आणि बचत वैशिष्ट्यासह येते. काय आहे ही योजना? यात गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या.

जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी भविष्यात पैसे गोळा करायचे असतील तर तुम्ही एलआयसीच्या जीवन तरुण योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता.

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करणार असाल तर त्याआधी तुम्हाला योजनेशी निगडित काही गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. या योजनेत किमान 75 हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करता येईल.तसेच कमाल रकमेची मर्यादा निश्चित करण्यात आली नाही.

समजा जर तुमचे मूल 8 वर्षांचे असेल आणि जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली. तर तुम्हाला एकूण 17 वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे.

या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मुलाचे पालक मरण पावले तर त्या मुलासाठी पुढील सर्व प्रीमियम्स माफ करण्यात येतात.या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याला नवा रंग देऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe