जिल्ह्यातील ‘ या मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालय मंजूर!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघापासून अहमदनगर जिल्हा रुग्णालय १०० किलोमीटर अंतरावर आहे.

उत्तर नगर जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय नाही त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी अहमदनगर येथे जाणे शक्य नसल्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणी दर्जा द्यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून कोपरगावसाठी उपजिल्हा रुग्णालयाला महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय आहे. मतदार संघातील लोकसंख्येचा विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन दिले होते. त्या दृष्टीने आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

मतदार संघातील नागरिकांना दुर्धर आजारावर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी जवळपास १०० किलोमीटर अंतर पार करून जावे लागते. एवढे मोठे अंतर पार करीत असतांना अंत्यवस्थ रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

कोपरगाव येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास नागरिकांची आरोग्याच्या दृष्टीने मोठी मोठी समस्या दूर होणार असल्यामुळे कोपरगाव ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी वारंवार मागणी केली होती.

त्या मागणीची दखल घेवून आरोग्य विभागाने कोपरगावला उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले हि मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे ३० बेडचे असलेले ग्रामीण रुग्णालय १०० बेडचे होईल.

नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स कायमस्वरूपी उपलब्ध राहतील. अतिदक्षता विभाग असल्यामुळे अंत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.

सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. आ. आशुतोष काळे यांनी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लावून उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळविल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जाहीरनामा प्रसिद्ध करून मतदार संघातील नागरिकांना शाश्वत विकासाचे स्वप्न दाखविले होते. निवडून आल्यानंतर दिलेल्या वचनांची वचनपूर्ती करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने योगायोगाने राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले.

त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या दृष्टीने प्रयत्न करीत असतांना काम अधिक सोपे झाले. कोरोनाच्या संकटात मतदार संघातील नागरिकांनी खूप दु:ख सोसले आहे त्याच्या वेदना मला देखील झाल्या आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न करतांना १०० बेडचेच उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे असा आग्रह लावून धरला होता.

उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देतांना ३० बेडवरून ५० बेडची मंजुरी देण्यात येते मात्र केलेल्या पाठपुराव्याची योग्य दखल व केलेल्या आग्रहातून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार व आरोग्य विभागाचे मतदार संघातील जनतेच्या वतीने जाहीर आभार.

कोरोनाच्या संकटात देखील दीडच वर्षात जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता होत असल्याचे आत्मिक समाधान मिळत असून उर्वरित वचनांची पूर्तता करण्यासाठी यापुढेही बांधील आहे असे आ.काळे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe