अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Formal success story :- काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. आणि आता आपल्या राज्यातील शेतकरी शेतीमध्ये (Farming) बदल स्वीकारत देखील आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा देखील होत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात (Indapur) देखील एका शेतकऱ्याने काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल केला आहे.
इंदापूर मधील एका शेतकऱ्याने चक्क पांढऱ्या जांभळाची शेती (White jamun cultivation) यशस्वी करून दाखवली आहे. हो बरोबर वाचलं तुम्ही, पांढऱ्या जांभळाची शेती.
आपण आतापर्यंत केवळ जांभळ्या रंगाचेच जांभूळ बघितले असेल मात्र या पठ्ठ्याने पांढऱ्या जांभळाची शेती केली आहे. डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यात पांढऱ्या जांभळाची यशस्वी शेती करून दाखविण्याची किमया भारत लाळगे नामक एका शेतकऱ्याने साधली आहे.
इंदापूर तालुक्यातील भारत लाळगे यांच्याकडे जवळपास 23 एकर शेतजमीन आहे. या तेवीस एकर शेतजमीन पैकी त्यांनी एक एकर क्षेत्रात आंतरपीक म्हणून पांढऱ्या जांभळाची लागवड केली आहे. एक एकर क्षेत्रासाठी भारत यांना 302 जांभळाची रोपे लागली.
भारत सांगतात की महाराष्ट्रात पांढऱ्या जांभळाची शेती करणारे ते एकमेव शेतकरी आहेत. इंदापूर तालुक्यात भारत यांची दोन ठिकाणी शेती आहे. त्या आपल्या शेतजमिनीत गेल्या अनेक वर्षांपासून डाळिंब आणि पेरू या पिकांची लागवड करीत आले आहेत.
मात्र, डाळिंबावर (Pomegranate Growers) सतत रोगाचे सावट येत असल्याने त्यांना मोठ आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
डाळिंब आणि पेरू (Guava Cultivation) या दोन्ही पिकामधून गेल्या चार वर्षापासून कवडीमोल उत्पन्न त्यांना मिळत आहे.
यामुळे भारत यांनी शेतीमध्ये बदल करण्याचे ठरवले आणि या अनुषंगाने त्यांनी पांढऱ्या जांभळाची लागवड केली. भारत सांगतात की पांढऱ्या जांभळा साठी अतिशय कमी पाणी आणि कमी खर्च लागतो यामुळेच त्यांनी पांढऱ्या जांभळाची शेती करण्याचे ठरवले.
सध्या भारत यांच्या पांढऱ्या जांभळाची हार्वेस्टिंग प्रगतीपथावर आहे. पांढऱ्या जांभळाला सध्या 300 ते 400 रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने त्यांना एक एकर पांढऱ्या जांभळाच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
या शिवाय पांढऱ्या जांभळाला बाजारात चांगली मागणी असल्याने विक्री करण्यासाठी देखील अधिक धडपड करावी लागत नाही. निश्चितच भारत यांनी केलेला हा बदल इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी सिद्ध होऊ शकतो.