अशी वेळ पुन्हा येणार नाही ! सोने झाले स्वस्त खरेदीची सुर्वणसंधी…

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मंगळवारी सोने स्वस्त झाले, तर चांदी महाग झाली. मौल्यवान धातूंच्या कमकुवत जागतिक किंमती आणि मजबूत रुपयामुळे राष्ट्रीय राजधानीत मंगळवारी सोन्याचे भाव 3 रुपयांनी कमी होऊन 45,258 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

यापूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति 10 ग्रॅम 45,261 रुपयांवर बंद झाले होते. चांदीच्या भावात आज किंचित वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे भाव फक्त 40 रुपयांनी वाढून 58,750 रुपये प्रति किलोवर बंद झाले.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत कोणतेही लक्षणीय बदल झाले नाहीत आणि ते 22.42 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

या कारणामुळे घसरले भाव – एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, फेडरल ओपन मार्केट कमिटीची दोन दिवसीय बैठक आजपासून सुरू झालीय.

अशा परिस्थितीत गुंतवणूकदार बैठकीच्या निकालांची आणि फेड अधिकाऱ्यांच्या निवेदनाची वाट पाहतील. त्याचवेळी, फॉरेक्स मार्केटमध्ये आज सकाळी रुपया डॉलरच्या तुलनेत 15 पैशांच्या मजबुतीसह 73.59 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत चढ -उतार सुरूच आहेत. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News