अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra News:- पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे गाळप हे झाल्यात जमा आहे. शिवाय जे शिल्लक क्षेत्र आहे त्याची तोडही वेळेत होईल. तर येथील यंत्रणा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कामी नाही आली तर मात्र, शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे.
त्यामुळे अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी सोलापूर येथील कारखान्यांची वाढीव मदत घेण्यात येणार आहे. मागील काही दिवसात कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या प्रयत्नामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याची तोड उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाली आणि एका गावाचा प्रश्न मार्गी लागला.

तर शेतकऱ्याने आनंदित होऊन कामगार शिवारात दाखल होताच. त्यांचे ढोल-ताशाच्या गजरामध्ये स्वागत केले होते.
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची मदत घेतली जाणार आसून त्याअगोदर गावनिहाय शिल्लक उसाचे नियोजन केले जाणार आहे.
आता एवढा एकच पर्याय राहिला असून यासंदर्भातथेट साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना प्रस्ताव देण्यात येणार आहे. जर आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसतोडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले आहे.