अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहिण शमिता शेट्टीचा आज वाढदिवस आहे. शमिता शेट्टी ही बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहिण आहे.
मोठ्या बहिणीप्रमाणे शमितानेही बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिची सुरुवातही मोठ्या धडाक्यात झाली पण नंतर शिल्पाप्रमाणे शमिताला यश मिळवता आले नाही.

दरम्यान ‘बिग बॉस’ १५ च्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक शमिता शेट्टी हिने चांगलीच लोकप्रियता मिळवली .शमिताने २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बते’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
‘साथिया’, ‘अग्निपंख’, ‘फरेब’, ‘बेवफा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये शमिताने काम केलं. शमिता २००९मध्ये छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती.
२०१९मध्ये शमिताने ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. शमिता ही एक इंटीरिअर डिझायनर आहे. ४३ वर्षांच्या शमिताने अद्याप लग्न केलेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब असणाऱ्या शमिताने ‘ब्लॅक विडोज’ या सीरिजमध्ये काम करत पुनरागमन केले. शमिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
शमिता सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. यंदाच्या शमिताचा वाढदिवस अधिक खास आहे कारण ती सिंगल राहिलेली नाही.
तिचा प्रियकर राकेश बापटसोबत तिने आपला खास दिवस साजरा केला. शमिता शेट्टीवर तिच्या वाढदिवशी प्रेमाचा वर्षाव करत राकेश बापटने सोशल मीडियावर फोटोंची एक स्ट्रिंग शेअर केली आहे.
या फोटोमध्ये दोघांना एकमेकांचा हात सोडणे कठीण जात असल्याचे दिसत आहे. शमिताची बहीण आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही सोशल मीडियावर प्रेमाने भरलेला संदेश लिहिला.
तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शिल्पाने शमितासोबत स्वतःचे आणि कुटुंबीयांचे फोटो असलेला एक सुंदर मोन्टाज व्हिडिओ शेअर केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम