अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी कडधान्य पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे.
दरम्यान जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या मागणी नूसार बियाणे आणि खतांचा पुरवठा होत असून सध्या बाजारपेठे मागणीच्या तुलनेत 70 टक्क्यांच्या जवळपास बियाणांचा पुरवठा झालेला आहे. जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर खर्याअर्थाने पेरण्यांना सुरूवात होणार आहे.
त्यावेळी सोयाबीन, बाजारी, तूर, मका या पिकांची मागणी राहणार असून मान्सूनमध्ये दमदार पाऊस झाल्यास कपाशीच्या बियाणांची मागणी वाढणार आहे. यासाठी कृषी विभागाने पहिल्या टप्प्यात 3 लाख 50 कपाशी बियाण्यांच्या पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात बियाण्यांची टंचाई होणार नाही. मागणीनूसार तातडीने सर्व पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकर्यांनी बियाणे खरेदीसाठी गर्दी करून नयेत, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांनी केले आहे.
काही ठिकाणी काळाबाजार सुरु… :- शेतकरी बि-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रात जात आहेत. सुरुवातीला दुकानदाराकडून खते, बियाणे शॉर्टेज असल्याचे सांगितले जाते आणि नंतर गिर्हाईकाचा अंदाज घेवून दुकारानातील कामगारच बि-बियाणे, खते एमआरपी पेक्षा जास्त पैसे घेवून विकत आहे. घेतलेल्या मालाचे पक्के बिलही दिले जात नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम