“मी त्यांना ट्विटरवर फॉलो करत नाही” अमृता फडणवीसांच्या ट्विटला सुप्रिया सुळेंकडून उत्तर

Published on -

मुंबई : भाजपचे (Bjp) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून योगी आदित्यनाथ सरकारचे (Yogi Adityanath) कौतुक करत राज्य सरकारवर (state government) टीका केली होती.

याबाबत माध्यमांसोबत संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्ट शब्दात ‘मी त्यांना ट्विटरवर (Twitter) फॉलो करत नाही असे उत्तर दिले आहे.

राज्यातील विविध घडामोडींबद्दल सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आले. खरे सांगायचे झाले, तर माझ्यासमोर सर्वांत मोठे आव्हान महागाईचे आहे. आता महागाईचे सर्वांत मोठे आव्हान समोर असताना मला काही सुचतच नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर बोलताना, मी तुम्हाला खरे सांगू का, मी नाही त्यांना ट्विटरवर फॉलो करत. मी मगाशी सांगितले तसे मला इतकी कामे असतात की मला माझ्या जबाबदाऱ्यांमधून बाकी काही करायला फारसा वेळ मिळत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav thackeray) निशाणा साधताना राज्यातील राज्यकर्ते हे भोगी असल्याचा टोला लगावला आहे.

याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News