Surya Grahan : सावधान! सूर्यग्रहणावेळी या राशींच्या लोकांनी घ्या विशेष काळजी, जाणून घ्या सूर्यग्रहणाची तारीख आणि धार्मिक महत्त्व

Surya Grahan : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. या सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक राशीच्या लोकांना काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिष शास्त्रामध्ये देण्यात आला आहे. ग्रहण काळात अनेक गोष्टी करण्यास मनाई करण्यात येत असते.

14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:34 वाजल्यापासून या सूर्यग्रहणाला सुरुवात होणार आहे. हे सूर्यग्रहण रात्री 8:34 वाजल्यापासून मध्यरात्री 2:25 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. चंद्र ग्रहण आणि सूर्य ग्रहण ही दोन्ही ग्रहणे अशुभ मानली जातात.

पुढील सूर्यग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात अश्विन महिन्याच्या अमावास्येला होणार आहे. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच त्याच्या सुतक काळात काही गोष्टी न करण्याचा सल्ला ज्योतिष शास्त्रात देण्यात आला आहे.

सूर्यग्रहण कुठे दिसणार

14 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतातील नागरिकांना त्याचा सुतक काळ वैध नाही. मेक्सिको, ब्राझील, व्हेनेझुएला, चिली, डोमिनिका, पॅराग्वे, पेरू, अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, कोलंबिया या ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी या सूर्यग्रहणाचा सुतक काळ वैध ठरणार आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या सूर्यग्रहणाचा कन्या, वृषभ, मेष, सिंह आणि तूळ राशींवर होणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये या राशीच्या लोकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी

पंचांगानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी हा १२ तास आगोदर सुरु होतो. तर चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ९ तास आधी सुरु होतो. येणाऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सकाळी 8.34 वाजता सुरु होऊन पहाटे 02:25 वाजता संपणार आहे.

सूर्यग्रहण कधी होते ते जाणून घ्या

हिंदू धर्मामध्ये सूर्यग्रहणाच्या सुतक कालावधीला अधिक माहित आहे. या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य कार्य करणे अशुभ ठरू शकते. त्यामुळे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधून जातो तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही तेव्हा सूर्यग्रहण होते.

ग्रहण काळात काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी

हिंदू धर्मानुसार ग्रहण काळात चुकूनही देवी देवतांची पूजा करू नये. तसेच शास्त्रज्ञांच्या मते हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.
ग्रहण काळात जेवण करणे टाळावे. तसेच जर जेवण करत असाल तर त्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत.
ग्रहाजन काळात चुकूनही नखे किंवा केस कापू नयेत. तसेच गर्भवती महिलांनी तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe