अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- घोडेगाव कौठा येथील युवकाच्या मृत्यूचा तपास करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीन पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.
या उपोषणात आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नईम शेख, आजीम खान, जमीर इनामदार,
पप्पू डोंगरे, संतोष पाडळे सहभागी झाले होते. घोडेगाव कौठा (ता. नेवासा) येथील युवक दिगंबर घनश्याम राऊत याचा मृतदेह दि.8 जुलै रोजी गट नंबर 135 या शेतातील विहिरीत आढळून आला.
पोलीस स्टेशनला आत्महत्येची नोंद झाली आहे. मात्र सदर युवकाने आत्महत्या केली नसून, सदर मृत्यू संशयास्पद असल्याचे आरपीआयच्या युवकांचे म्हणने आहे.
घातपात असल्याच्या संशयाने आरपीआयने युवकाच्या मृत्यूचा तपास करण्याची मागणी लाऊन धरली आहे.
या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन उपोषण करण्यात आले होते. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम