Suzuki Swift : मारुती सुजूकी ही भारतातील दिग्ग्ज वाहन निर्माता कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. तसेच कंपनी या कारमध्ये शानदार फीचर्सही उपलब्ध करून देत असते.
भारतीय बाजारपेठेतील मारुती सुझुकी स्विफ्ट ही लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. आता ग्राहकांच्या भेटीला ही कार एका नवीन अवतारात येत आहे. Swift Mokka Cafe Edition आता बाजारात येत आहे. कंपनीच्या या नवीन कारची किंमत 15.36 लाख रुपये इतकी आहे.
डिझाईनमधील बदलांनुसार, स्विफ्ट मोक्का कॅफे एडिशनला अनेक अपडेट्स मिळत आहे. त्यामुळे आणखी जास्त आक्रमक आणि स्पोर्टी लुकमध्ये दिसत आहे. यात एक आक्रमक फ्रंट लिप स्पॉयलर, फॉग लाइट्सच्या वर एलईडी डीआरएल आणि बॉडी क्लेडिंगचा समावेश असून जो समोरच्या स्पॉयलरपासून त्याच्या चाकांच्या कमानी आणि मागील बंपरपर्यंत विस्तारित केला आहे. तर या कारच्या मागच्या बाजूस ट्विन फॉक्स एक्झॉस्ट टिप्स आहेत. या नवीन कारला 17-इंच आफ्टर-मार्केट अलॉय व्हील्स मिळतात.
इतकेच नाही तर स्विफ्ट मोक्का कॅफे एडिशनला नवीन ड्युअल-टोन कलर कॉम्बिनेशन मिळत आहे. या कारच्या खालच्या भागाला उबदार पेस्टल तपकिरी रंग आणि छतावर आणि ORVMs वर मजबूत बेज रंग मिळत आहे. तर आतील भाग डॅशबोर्ड आणि दरवाजाच्या घटकांवर पेस्टल ब्राऊन आणि बेज आणि तपकिरी नप्पा लेदर सीट अपहोल्स्ट्री दिले आहेत. यात अँड्रॉइड ओएसवर चालणारी 10-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली असून जी इंटीरियरशी जुळते.
थायलंडमध्ये सादर करण्यात आलेले मॉडेल 1.2L पेट्रोल इंजिनसह येते, जे 83 PS पॉवर आणि 108 Nm जनरेट करते. तर इंजिन E20 इंधनावर चालते (इथानॉल 20% मिश्रण). हे स्विफ्ट लाइनअपमधील जास्त पर्यावरणपूरक पर्यायांपैकी एक बनते, जे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि इंधन कार्यक्षमता सुधारण्यासाठी विकसित केले आहे. विश्वासार्ह पण स्पोर्टी पर्याय शोधत असणाऱ्या खरेदीदारांना ही कार एक उत्तम पर्याय आहे.